चीनमधील Dalian Sunasia Ocean World मधील एक अद्भुत व्हिडिओ अलीकडे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला. या व्हिडिओमध्ये बेलुगा व्हेल (Beluga Whale) जणू एखाद्या नायकासारखी कामगिरी करताना दिसत होता. प्रसंग असा की बेलुगा इंटरॅक्शन झोनमध्ये (Beluga Interaction Zone) उभा असलेला एक मनुष्य, जेथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे तिथे तो सहजपणे सिगारेट पेटवतो. कर्मचारी त्याच्याकडे जाण्याआधीच अचानक बेलुगाने मागून जोरदार पाण्याचा फवारा मारून त्याची सिगारेट अचूकपणे विझवली. हा क्षण पाहून सर्वजण थक्क झाले आणि काही सेकंदांतच व्हिडिओ व्हायरल झाला.
हा व्हिडिओ “इशारे दुर्लक्षित करणाऱ्या व्यक्तीला बेलुगाने दिलेला भन्नाट धडा!” अशा कॅप्शनसह शेअर करण्यात आला. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी या प्रसंगाचे भरभरून कौतुक केले. एकाने लिहिले, “व्हेलच्या चेहऱ्यावरचा अभिमान बघायलाच हवा!” तर दुसऱ्याने विनोदी शैलीत टिप्पणी केली, “सूचना न पाळणाऱ्याला व्हेलकडून दिलेली शिक्षा… यापेक्षा परफेक्ट काही असू शकत नाही!” काही प्रेक्षकांनी बेलुगाच्या अचूकतेचे श्रेय त्यांच्या नैसर्गिक echolocation क्षमतेला दिले. तर काहींनी हा व्हिडिओ AI-generated असू शकतो अशी शंका व्यक्त केली.
व्हिडिओवरील चर्चा वाढत गेली तशी त्याबद्दलची उत्सुकताही अधिकच वाढत होती. पण काही तासांतच या नाट्यमय व्हिडिओचे खरे वास्तव समोर आले. The Beijing News च्या अहवालानुसार, हा संपूर्ण प्रसंग प्रत्यक्ष नसून फायर-सेफ्टी जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रचार व्हिडिओचा भाग होता. व्हिडिओतील मनुष्य, कर्मचारी आणि इतर सर्वजण प्रत्यक्षात Ocean World चेच कर्मचारी होते. त्या दिवशी या दृश्याचे अनेक rehearsed shots घेतले गेले होते. Global Times नेही पुष्टी केली की हा घटनाक्रम पूर्णपणे स्क्रिप्टनुसार सादर करण्यात आला होता. हे पहिल्यांदाच घडलेले नाही.
At Dalian Ocean World大连圣亚海洋世界, a man ignored staff warnings and kept smoking.
Right then, a beluga whale from behind sprayed a water jet—bullseye!—putting out his cigarette in the coolest way possible. pic.twitter.com/0RC1rsE8Bk — China in Pictures (@tongbingxue) December 7, 2025
चीनमधील Liaoning Province मधील इतर जलसंग्रहालयांमधूनही अशाच प्रकारचे बेलुगा व्हेलचा सहभाग असलेले सुरक्षा-जागृती व्हिडिओ यापूर्वी व्हायरल झाले आहेत. जरी हा प्रसंग बनावटी असला तरी त्याची सादरीकरणशैली, बेलुगाचा अचूक निशाणा आणि विनोदी टायमिंग यामुळे हा व्हिडिओ जागतिक प्रेक्षकांसाठी अत्यंत मनोरंजक ठरला. व्हेलची “शिस्त-शिक्षा शैली” पाहून लोक हसताहसता चकित झाले आणि फायर-सेफ्टीसारखा गंभीर विषयही आकर्षक पद्धतीने पोहोचवण्याचा हा अनोखा प्रयत्न प्रेक्षकांनी कौतुकाने स्वीकारला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.