विमानात हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला अटक

विमानात हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन करणाऱ्याला अटक

दिल्लीहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेससोबत गैरवर्तन करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. स्पाईसजेटच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी अबसार आलम या फ्लाइटमधील आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. यानेच हवाई सुंदरीसोबत गैरवर्तन केले होते.
आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. प्रवासी आणि त्याच्या सहप्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले, त्यानंतर दोघांना विमानातून उतरवण्यात आले.

सोमवारी स्पाइसजेटच्या एसजी-8133 दिल्ली-हैदराबाद फ्लाइटमधील एका प्रवाशाने केबिन क्रू सदस्याला त्रास दिला. कंपनीच्या म्हणण्यानुसार, स्पाइसजेटची फ्लाइट २३ जानेवारी दिल्लीहून हैदराबादला जाणार होती. मात्र, दिल्लीत बोर्डिंगदरम्यान एका प्रवाशाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्याला विमानातून उतरवण्यात आले.

काय घडला प्रकार पाहुयात ?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version