PMC Schools Nipun Survey: पुण्यातील विद्यार्थी लेखन-वाचनात मागे? ‘निपुण’ मूल्यांकनातील गंभीर आकडेवारी आली समोर

PMC Schools Nipun Survey: शिक्षणाचे माहेरघर 'निपुण' मूल्यांकनात मागे पडले आहे.
PMC Schools Nipun Survey: पुण्यातील विद्यार्थी लेखन-वाचनात मागे? ‘निपुण’ मूल्यांकनातील गंभीर आकडेवारी आली समोर

पुणे: शिक्षणाचे माहेरघर 'निपुण' मूल्यांकनात मागे पडले आहे. पुणे महापालिका शाळांमध्ये मार्च महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात लेखन आणि वाचनात विद्यार्थ्यांची चिंताजनक आकडेवाडी समोर आली आहे. तब्बल 16.7 आणि 20.1 टक्के विद्यार्थी अपेक्षित पातळी गाठू शकलेले नाहीत.

या अहवालानुसार 70.1 टक्के विद्यार्थी वाचनात निपुण ठरले आहेत. जवळपास 30 टक्के विद्यार्थी अपेक्षित वाचनस्तरापर्यंत पोहोचलेले नाहीत. लेखनातही 71.4 टक्के विद्यार्थी निपुण, तर 27.9 टक्के विद्यार्थी मागे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. परंतु गणितात 83.3 टक्के विद्यार्थ्यांची कामगिरी दिलासादायक आहे. महापालिकेच्या सुमारे 320 शाळांपैकी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सुमारे 70 टक्के विद्यार्थी वाचन-लेखन करू शकतात. 

हा अहवाल केवळ 224  शाळांच्या माहितीवर आधारित आहे. कारण डेटा संकलनातील काही त्रुटींमुळे 55 इंग्रजी माध्यम आणि 40 लॉगिन आयडी नसलेल्या शाळांचे मूल्यांकन या अहवालात उपलब्ध नाहीयत. 

यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांची शाळानिहाय माहिती गोळा करून त्यांच्यासाठी आवश्यक तरतुदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित शिक्षकांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version