हेमा पिंपळेंची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

हेमा पिंपळेंची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हिजाब समर्थनासाठी आंदोलन करणाऱ्या बीडच्या ऍड. हेमा पिंपळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

मागील २० वर्षापासून बीडच्या राजकारणात सक्रिय असलेल्या ऍड. हेमा पिंपळे यांनी शिवसेनेत नऊ वर्षे काम केले आहे. शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी महागाईविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात नवी ओळख निर्माण केली. त्यानंतर २०१०मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

रुपाली चाकणकर यांनी का दिला राजीनामा?

रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपद देखील आहे. तसेच त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ यानुसार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version