पंतप्रधानांच्या सुरक्षेत अक्षम्य चूक

पंतप्रधानांच्या सुरक्षेत अक्षम्य चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली आहे.

हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून ३० किलोमीटर अंतरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाहनताफा पोहचला होता. मात्र वाटेतच आंदोलकांनी त्यांचा वाहनताफा रोखून धरला. त्यामुळे पंतप्रधानांना काही वेळ वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेत अक्षम्य चूक झाली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब सरकारला टोमणा मारला आहे. ‘पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना सांगा, मी जिवंत परतलो’, असा टोमणा पंतप्रधानांनी मारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यानचे पूर्ण वेळापत्रक पंजाब सरकारला कळवण्यात आले होते. मात्र त्यांच्या सुरक्षेबाबत काहीही योजना आखण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान येणार म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी योजना आखण्यात येते तसेच ऐनवेळी काही घडल्यास त्या पद्धतीने व्यवस्थाही करण्यात येते. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा वाटेतच अडवल्यामुळे त्यांना काही वेळे वाटेतच थांबावे लागल्यामुळे पंजाब सरकारने त्यासंदर्भात काहीही सुरक्षा तैनात केलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version