चॅटनंतर मलिकांनी उघड केले के.पी. गोसावीचे ऑडिओ क्लिप

चॅटनंतर मलिकांनी उघड केले के.पी. गोसावीचे ऑडिओ क्लिप

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरील आरोप सुरूच आहेत. मलिकांनी के.पी. गोसावी यांचे अज्ञात व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स ट्विट केले आहेत.

  नवाब मलिकांनी के. पी. गोसावी यांचे व्हॉट्सऍप चॅट सादर केले आणि आता के. पी. गोसावी यांचे ऑडिओ क्लिप्स सादर केले आहेत. त्यामुळे मलिकांनी पोस्ट केलेल्या ऑडिओ क्लिप्समुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे.

   क्रुझवरील आर्यन खान ड्रग्जप्रकरणी नवाब मलिकांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या के.पी. गोसावीचे व्हॉट्सअप चॅट ट्विट केले आहेत. ‘क्रुझवरील ड्रग्जपार्टीत ठराविक लोकांना अडकवण्यासाठीचे प्लॅनिंग के.पी. गोसावी आणि खबरीमधील व्हॉट्सऍप चॅटमधून समोर आले आहे.’ त्यामुळे ही समीर दाऊद वानखेडे यांची प्रायव्हेट आर्मी आहे आणि याची उत्तरे त्यांना दावेच लागतील, असे नवाब मलिकांनी ट्विट करत सांगितले आहे. तसेच आता के.पी. गोसावी यांचे ऑडिओ क्लिप्स सादर केल्यामुळे याप्रकरणी नवी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version