मुंबईच्या प्रदूषणाबद्दल आदित्यचे केंद्राला पत्र

मुंबईच्या प्रदूषणाबद्दल आदित्यचे केंद्राला पत्र

उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री भूपींदर यादव यांना पत्र लिहिले आहे. मुंबईसह राज्यातील हवेची गुणवत्ता ढासळली असून केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप करावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहून केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलं?

गेल्या सहा महिन्यात मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला एक्यूआयवर सातत्याने खराब आणि खूप खराब रेट करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील इतर शहरे देखील हवेच्या गुणवत्तेबबाबत पोस्ट करत असतात, त्यामुळे केंद्र सरकारने याप्रकरणी हस्तक्षेप  करावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केंद्राला पत्र लिहित केली आहे.

पत्रात पुढे लिहिले की, मी भूपिंदर यादव यांना महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता ढासळली असल्याबाबत पत्र पाठवलं आहे. मुंबईतील बिघडलेल्या हवेमुळे नागरिकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. महाराष्ट्रातील शहरांमध्ये ताजी हवा आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यामुळे पत्र लिहीत मुंबईच्या एक्यूआयवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तसेच राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नसल्याचेही पत्रात नमूद केले आहे. तसेच, माहुल किंवा वडाळा यांसारख्या पूर्व मुंबईतील ठिकाणी बांधकाम प्रकल्प, रिफायनरी आणि खतनिर्मिती संयंत्रे हवा प्रदूषणाची प्रमुख कारणे असल्याचे आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version