Adinath Kothare and Urmila Kothare Divorce: चर्चांना पूर्णविराम! आदिनाथ-उर्मिला यांनी अधिकृतपणे जाहीर केला घटस्फोट

दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर संयुक्त पोस्ट शेअर करत परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Adinath Kothare and Urmila Kothare Divorce: चर्चांना पूर्णविराम! आदिनाथ-उर्मिला यांनी अधिकृतपणे जाहीर केला घटस्फोट

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता-दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानिटकर यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनीही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर संयुक्त पोस्ट शेअर करत परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

पोस्टमध्ये त्यांनी हा निर्णय अत्यंत विचारपूर्वक घेतल्याचे सांगितले आहे. आयुष्यातील पुढचा प्रवास आता स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय घेतला असला, तरी एकमेकांबद्दलचा आदर कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, या वैयक्तिक निर्णयाचा आदर करत त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान राखण्याची विनंती त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून आदिनाथ आणि उर्मिला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वारंवार रंगत होत्या. मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधीही थेट प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर स्वतःच अधिकृत पोस्ट शेअर करत त्यांनी घटस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जात होते. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, सोशल मीडियावर अनेकांनी दोघांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version