जाधवांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल

जाधवांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आज शिवसेना नेते आणि महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान आयकर विभागाचे धाडसत्र जोरात सुरू असून आयकर विभागाने आणखी एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर छापा टाकला आहे. यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय विजय लिपारे यांच्या घरी आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे.

आज सकाळी आयकर विभागाने शिवसेनेच्या यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकाला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी यशवंत जाधव यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहित्या आधारावर यशवंत जाधव यांचे निकटवर्तीय विजय लिपारे यांच्या काळाचौकी या घरी छापा टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. तसेच यासंबंधित पुरावेदखील सोमय्यांनी आयकर विभागाच्या हाती दिले होते. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यासाठी आयकर विभागाला मदत करणार असल्याचे सोमय्या म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version