बंगालच्या उपसागरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बंगालच्या पारादीप बंदरातून लोहखनिज घेऊन जाणारे एक परदेशी मालवाहू खोल समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेले जहाज हे पनामा ध्वजांकितचे एक मालवाहू जहाज होते जे ओडिसाच्या किनाऱ्याहून निघाले होते. यादरम्यान 240 सागरी मैल अंतरावर बंगालच्या उपसागरात पोहचताच हे जहाज बुडाले. दरम्यान, भारतीय नौदलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
या जहाजावर 24 खलाशी अडकल्याची माहिती मिळत आहे. 1700 टन लोहखनिजाचा भुगा घेऊन हे वाहन निघाले होते. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाने बचाव मोहीम सुरू केली आहे. यामध्ये जे बचावलेले कर्मचारी आहेत, ते जास्त करून चिनी आहेत. या घटनेमुळे जहाजावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. यावेळी बचावकार्यात मदत करण्यासाठी परिसरातील इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान इंडियन कोस्ट गार्डच्या पारादीप युनिटचे उपमहानिरीक्षक संजय नेगी यांनी या अपघाताबद्दल माहिती देत म्हटले की, अंदमान आणि निकोबार युनिटद्वारे शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. जहाजावर 24 खलाशी होते, त्यापैकी 20 चिनी नागरिक, दोन म्यानमारचे नागरिक आणि एक बांगलादेशी असल्याची माहिती मिळत आहे.
उर्वरित खलाशांची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. जहाजाचा शोध घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी परिसरातील इतर जहाजांनाही सतर्क करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीमधून जहाज बुडण्याचे नेमके कारण उघड होत नाही. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाली. अजूनही जहाजाचा शोध सुरू आहे. कर्मचाऱ्यांबाबतही चिंता व्यक्त केली जातं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.