बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात एम आय एम खासदार ओवेसींच्या सभेदरम्यान औरंगजेबाबाबत नारे लागले असल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. बुलढाणा पोलिसांनी या व्हिडिओची गांभीर्याने दखल घेतली आहे. मलकापूर पोलिसांनी काही अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले असून माध्यमांवर चाललेल्या या व्हिडिओची न्यायवैद्यक तपासणी करणार असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतरच खासदार ओवेसींच्या सभेत औरंगजेबाबाबत नारे लागले किंवा नाही ते कळणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.