अतिवृष्टीमुळे कोल्हापूर- गगनबावडा, गडहिंग्लज- नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड- बस्तवाड, दानोळी- कवठेसार, कागल- बस्तवडे, कागल- बाणगे, गगनबावडा- कोल्हापूर आणि आजरा- चंदगड या नऊ मार्गावरील ST वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार बोरपाडळेमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे.
संभाजीनगर- राधानगरी मार्गावर हळदी येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डू शेळेवाडीमार्गे वाहतूक सुरू आहे.
इचलकरंजी- कागल- मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने पर्यायी पाचमैल मार्गे वाहतूक सुरू आहे.
इचलकरंजी-नृसिंहवाडी मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोणपर्यंत वाहतूक सुरू आहे.
इचलकरंजी नृसिंहवाडी मार्गावर लाट- हेरवाड पुलावर पाणी आल्याने पर्यायी पाच मैल मार्गे वाहतूक सुरू.
गारगोटी-किल्ला पाल मार्गावर रस्ता खराब झाल्याने पर्यायी मालवाडी मार्गे वाहतूक सुरू आहे.
मलकापूर -गावडी मार्ग अंशत: बंद आहे.
कुरूंदवाड-लाट-हेरवाड मार्गावर हेरवाड येथे पुलावर पाणी आल्याने पाच मैलमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-टाकळे दानवाड मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने दत्तवाडमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्यावर पाणी असल्याने इचलकरंजी/ जयसिंगपूरमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-अकिवाट-राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने आकिवाट टाकळीमार्गे वाहतूक सुरू आहे.
कागल- इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी आल्याने हुपरीपर्यंत वाहतूक सुरू आहे.
राधानगरी- काटीवडे मार्गावर पुलावर पाणी असल्याने पर्यायी गुडाळमार्गे वाहतूक सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.