Building Collapses : मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळली. अनेक विद्यार्थी अडकल्याची भीती आहे. सत्य निकेतन हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय परिसर आहे.
Building Collapses : मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दिल्लीतून एक मोठी बामती समोर येत आहे. दिल्लीच्या सत्य निकेतन परिसरातील शिव मंदिराच्या जवळ रविवारी दुपारी एक पाच इमारत कोसळली असून, काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं.

हेही वाचा- Bittu Tabahi Biaora: ‘बिट्टू तबाही’ची अजनार नदीसाठी एकाकी लढाई; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, नेदरलँडसमधून नोकरीची ऑफर

यामध्ये 2 ते 3 जणांना ढिगाऱ्याखाली बाहेर काढण्यात यश आले आहे आणि तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील प्रसिद्ध सत्य निकेतन परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान घटना लक्षात येताच स्थानिकांकडू बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु असताना ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत एक पीजी (पेइंग गेस्ट) इमारत कार्यरत होती आणि अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मात्र नेमके किती लोक या इमरातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान ही इमारत अचानक कोसळल्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version