गणेशाची ३१ फूट मूर्ती प्राणप्रतिष्ठा

गणेशाची ३१ फूट मूर्ती प्राणप्रतिष्ठा

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाबाहेर श्री सिध्दी महागणपती भव्य अस देवस्थान उभारण्यात येत आहे. श्री सिध्दी वेंकटेश देवस्थानाच्या वतीने विश्वस्त श्रीकांत मणियार यांच्या वतीने हे भव्य असं मंदीर साकारण्यात येत असून याठिकाणी देशात कुठेही नाही, तब्बल ३१ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्तीची आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने प्राणप्रतिष्ठा करण्यात सुरुवात आली.

३७४ टन वजनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.दक्षिण भारतात, ज्या ठिकाणी दगड मिळाला, त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. टन एवढे या मूर्तीचे वजन आहे. तसेच या मूर्तीच्या आजूबाजूला १५ फूट उंचीच्या रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती सुद्धा आहेत. आजूबाजूला रिद्धी-सिद्धी असलेले आणि तर श्री गणरायाच्या सोंडेत अमृत कुंभ, पोटावर नाग, आणि कपाळावर घंटा अशी मूर्ती असलेले गणरायांचे हे देशातलं एकमेव मंदिर असल्याचं विश्वस्त सांगतात.

तब्बल २०० किलो वजनाची घंटा सुद्धा याठिकाणी असून ही विशालकाय मूर्ती आणण्यासाठी मुंबईतून क्रेन मागवण्यात आली. आधी मूर्ती ठेवण्यात आली, त्यानंतर आता मंदिर साकारण्यात येत आहे. जिल्हाभरातच्या चार ते पाच हजार भाविकांनी लिहिलेली ओम गण गणपतेय नम: अशी मंत्र असलेली तब्बल २१ कोटी एवढी मंत्र लिहिलेली पुस्तके या मूर्तीखाली ठेवण्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी राजस्थान, काशी अशा वेगवेगळ्या राज्यांमधील १८ विद्वानांना बोलावण्यात आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version