तेलंगणच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी ईडीच्या ताब्यात

तेलंगणच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी ईडीच्या ताब्यात

हैदराबाद, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारत राष्ट्र समितीची आमदार के. कविता हिला दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीच्या हैदराबाद येथील पथकाने ताब्यात घेतले आहे. के. कविता ही तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आहे. याआधी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात सीबीआय आणि ईडीने के. कविता हिची चौकशी केली होती. आता ईडीने के. कविता हिला ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने के. कविताची जवळपास नऊ तास चौकशी केली होती. दारू घोटाळ्यातून मोठी रक्कम घेतल्याच्या संशयावरून के. कविताची चौकशी करण्यात आली. तेलंगणमधील काही नेते आणि व्यावसायिक यांचीही चौकशी करण्यात आली. याच घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आठ वेळा समन्स बजावले आहे. पण अद्याप केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाही.

केसीआरची मुलगी कविता ईडीच्या ताब्यात, के. कविता तेलंगणाची माजी अबकारी मंत्री

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने आज केसीआर यांची मुलगी आमदार के. कविता यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून दिल्लीला चौकशीसाठी नेले जात आहे. त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

कविता यांच्या हैद्राबाद येथील घरी आज सकाळीच ईडीचे पथक पोहचले होते. दिल्ली दारू घोटाळ्यात त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना यापूर्वी चौकशीसाठी हजर राहण्याचे दोनदा समन्स पाठवले होते. पण दोन्हीवेळा कविता यांनी चौकशीला जाणे टाळले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version