केदारनाथ मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार

केदारनाथ मंदिराचे दरवाजे ‘या’ दिवशी उघडणार

केदारनाथ, ८ मार्च २०२४, प्रतिनिधी : हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते म्हणून बंद केलेले केदारनाथ मंदिर मे महिन्यात दर्शनासाठी पुन्हा खुले होणार आहे. केदारनाथ मंदिराचे दरवाजे यंदाच्या वर्षी १० मे रोजी उघडणार आहेत. महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून ही घोषणा करण्यात आली. ओमकारेश्वर मंदिरातील पंचकेदार गादीवरून ही घोषणा करण्यात आली.

प्रथेनुसार ओमकारेश्वर मंदिरातून बाबा केदारनाथ अर्थात भगवान शंकर यांची पालखी वाजतगाजत निघेल. ही पालखी मंदिराजवळ येताच केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले जातील. यानंतर बाबा केदारनाथ मंदिरात विराजमान होतील. पूजा केली जाईल. भाविकांसाठी केदारनाथ मंदिर दर्शनाकरिता खुले होईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version