Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेते शोकाकूल, स्व. अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

अजित पवार यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. यावेळी सर्वच नेते खूप भावूक झालेले दिसून आले. 
Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेते शोकाकूल, स्व. अजित पवारांना वाहिली  भावपूर्ण श्रद्धांजली

आजपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. मुंबईतील विधानभवनात हे अधिवेशन पार पडणार आहे. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनातील वातावरण भावूक झालेले पाहायला मिळाले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्याप्रमाणे अजित पवार यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली. यावेळी सर्वच नेते खूप भावूक झालेले दिसून आले. 

विधानभवनात पारंपरिक पद्धतीनुसार,  प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडून मांडला गेला. मात्र, यावेळी अनेक सदस्यांनी अजित पवार यांच्या कार्याबाबत सभागृहात मनोगत व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याने शोकप्रस्तावावर विशेष चर्चा होणार आहे. 

हेही वाचा – Maharashtra Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; कोणते विषय ठरणार चर्चेचे केंद्रबिंदू? 

अजित पवार 28 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीकडे जात असताना त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताना दुर्घटना घडली.  यामध्ये  अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.

हेही वाचा – Sunetra Pawar: अजित पवारांच्या विमान अपघातावरुन संशयकल्लोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या… 

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. यावेळी रोहित पवार यांनी अजित दादांना फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शाहाच न्याय देऊ शकतात, असंही ते म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version