Education Ministry Meeting : शिक्षण मंत्रालयाचा मोठा ॲक्शन मोड! 600 तज्ज्ञांना देखवला थेट घरचा रस्ता; कार्यालयांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय

शिक्षण मंत्रालयाने NTAच्या परीक्षा टीममध्ये मोठा फेरबदल केला असून 600 तज्ज्ञांना हटवून त्यांच्या जागी नवीन तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.
Education Ministry Meeting : शिक्षण मंत्रालयाचा मोठा ॲक्शन मोड! 600 तज्ज्ञांना देखवला थेट घरचा रस्ता; कार्यालयांच्या सुरक्षेसाठी मंत्रालयाचा मोठा निर्णय

देशात शिक्षण व्यवस्थेवर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या घटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच केंद्रीय परीक्षा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी फॉलो-अप बैठक घेतली. या बैठकीत NTAच्या परीक्षा टीममध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. NTAच्या परीक्षा टीमची पुनर्रचना करण्यासाठी तब्बल 600 तज्ज्ञांना टीममधून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी परीक्षांच्या आयोजनात अधिक सक्षम आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या बैठकीत परीक्षांचे आयोजन सुरळीत आणि सुरक्षित पद्धतीने करण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याचे निर्देश जोशी यांनी दिले. तसेच शिक्षणमंत्र्यांच्या सूचनेनंतर NTAच्या महासंचालकांनी बैठकीत आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

हेही वाचा- Metro Line 13 Approves : विरारकरांचा प्रवास होणार सुखकर! मेट्रो-13 प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी; मीरा-भाईंदरशी जोडला जाणार वसई-विरार
 
50 हून अधिक कर्मचाऱ्यांना हटवून 25 नवीन अधिकाऱ्यांची भरती
17 ऑगस्ट रोजी शिक्षण मंत्रालयाने परीक्षांमधील वादांच्या पार्श्वभूमीवर NTA ने परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना हटवले होते. तसेच 10 नव्या व्यावसायिक नेतृत्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. तर NTAच्या प्रशासकीय यंत्रणेलाही अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेत पुढील दोन ते तीन आठवड्यांत 20 ते 25 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात NTA मध्ये चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, चीफ फायनान्स ऑफिसर, चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, टेस्ट सिक्युरिटीसाठी जनरल मॅनेजर आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसेच सायकोमेट्रिक्ससाठी जनरल मॅनेजर यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर भरती केली जात आहे.

याशिवाय सायबर सिक्युरिटी, सायकोमेट्रिक्स आणि प्रश्नपत्रिका तयार करण्यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. त्याचसोबत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची तपासणी अधिक सुरक्षित आणि प्रभावी करण्यासाठी चार-स्तरीय प्रश्नपत्रिका तपासणी प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून अंतिम तपासणीपर्यंतच्या प्रक्रियेत अधिक खबरदारी घेतली जाणार आहे. 

Maharashtra Govt DA Hike: सणासुदीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना फडणवीस सरकारची मोठी भेट; महागाई भत्त्यात वाढ
 
NTA कार्यालयांमध्येही मोठा बदल, नवीन ठिकाणी हलवणार
परीक्षा सुरक्षेच्या दृष्टीने NTA ची कार्यालये लवकरात लवकर नव्या ठिकाणी स्थलांतरित केली जाणार आहेत. यावेळी NTAची कार्यालये ‘War Footing’वर नवीन ठिकाणी हलवण्यात येणार असून, नव्या कार्यालयांमध्ये CISF च्या पथकांमार्फत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येणार आहे. NTA कडून JEE (Main), NEET (UG), CUET (UG) आणि UGC-NET यांसारख्या प्रमुख प्रवेश आणि पात्रता परीक्षा घेतल्या जातात. CISF च्या पथकांची मदत घेऊन प्रश्नपत्रिका आणि परीक्षेशी संबंधित संवेदनशील माहितीच्या सुरक्षेला अधिक महत्त्व दिले जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version