क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश करणाऱ्या एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान या संघटनेने एनसीबीच्या कार्यालयासमोर समीर वानखेडे यांचा जाहीर सत्कार केला आहे.
क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडेंवर अनेक आरोप करत आहेत. समीर वानखेडे निर्दोष लोकांना ड्रग्ज प्रकरणी अडकवतात. तसेच समीर वानखेडे यांच्या धर्मावरदेखील प्रश्न उपस्थित केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
अशा परिस्थिती समीर वानखेडे यांना शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. वानखेडेंच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक नितीन चौगुले आणि त्यांचे कार्यकर्ते एनसीबी कार्यालयाच्या बाहेर जमले होते. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान या संघटनेने एनसीबीच्या कार्यालयासमोर समीर वानखेडे यांचा जाहीर सत्कार केला. नवाब मलिक वानखेडेंवर आरोप करत आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यासारख्या मंत्र्यांना आमचा विरोध आहे. त्यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करत राहू असे नतीन चौगुले यांनी सांगितले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.