Rajnath Singh : ‘नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…’ राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

गुजरातमधील बडोदा येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाचा दावा
Rajnath Singh : ‘नेहरुंना सरकारी पैशाने अयोध्येत बाबरी मशीद बांधायची होती, पण…’ राजनाथ सिंह यांचं मोठं विधान

अयोध्येतील बाबरी मशिदीचा उल्लेख अनेकदा राजकीय वर्तुळात वाद निर्माण होत असल्याच पाहायला मिळत आहे. गुजरातमधील बडोदा येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे.

ज्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना अयोध्येत बाबरी मशीद सार्वजनिक निधीतून बांधायची होती . मात्र, सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांची योजना यशस्वी होण्यापासून रोखली. त्यामुळे बाबरी मशीद पुन्हा बांधता आली नाही. असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला आहे.’ 

यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “सरदार वल्लभभाई पटेल हे उदार व्यक्ती देखील होते. ते खऱ्या अर्थाने सेक्युलर होते. ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरु बाबरी मशीदच्या बाबतीत सरकारी धन खर्च करण्याचा विचार करत होते. सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करून बाबरी मशीद बनवली पाहिजे, असं जेव्हा ते म्हणाले… त्यावेळेस त्यांच्या या कल्पनेचा विरोध जर कोणी केला असेल, तर गुजराती आईच्या पोटातून जन्म घेणारे सरदार वल्लभभाई पटेल होते”.

हेही वाचा- Ajit Pawar: पर्यावरण वाचलं तरच… ‘तपोवन’ प्रकरणी अजित पवारांच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाचा खडा

“त्यावेळेस त्यांनी सरकारी पैशातून बाबरी मशिद बनवू दिली नाही. त्यानंतर जवाहरलाल नेहरु यांनी सोमनाथ मंदिराच्या पुननिर्माणावर प्रश्न उपस्थित केला. नेहरुजींनी विचारलेल्या प्रश्नावर वल्लभभाई पटेल एकदम शांत स्वरात म्हणाले की, सोमनाथ मंदिराचा मुद्दा वेगळा आहे. त्याठिकाणी 30 लाख रुपयांची रक्कम जनताने दान केली आहे. त्याच्यासाठी एक ट्रस्ट तयार केली गेली आहे”.

“त्याच्यासाठी सरकारकडून एक रुपया पण खर्च नाही केला गेला. त्याचसोबत अयोध्यामध्ये जो भव्य राम मंदिर उभारला गेला आहे, त्याच्यासाठी सरकारच्या तिजोरीतून एक रुपया पण खर्च नाही केला.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंवरून केलेल्या या दाव्यामुळे राजकीयवर्तूळात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version