अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचा रस वाढला

अध्यक्षपदासाठी भास्कर जाधव यांचा रस वाढला

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं आहे. ते चिपळून येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही भास्कर जाधव म्हणाले आहेत.

शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात तालिका सभापती म्हणून काम करताना भास्कर जाधव यांनी गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केलं होतं. शिवसेनेकडे वनखातं राहून जर अधिकचं विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर ते स्वीकारावं असंही ते म्हणाले.

‘तालिका अध्यक्षपद घेतल्यानंतर या पदाचे अधिकार, सदस्यांचा मान-सन्मान राखणे, महत्त्वाचे विषय हाताळताना नियम व शिस्त याला प्राधान्य देण्याचे मी ठरवले होते आणि यातून दिर्घकाळ आपली कामगिरी लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे असा विचार केला होता. मी पाच वेळा विधानसभेत निवडून गेलो आहे.अधिवेशनात चुकीच्या प्रथा पडता कामा नये. नव्याने येणाऱ्या सदस्यांना विधानसभेचे कामकाज समजले पाहिजे यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली’, असं स्पष्टीकरण भास्कर जाधव यांनी यावेळी दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version