कोकणचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हापूस आंब्याच्या आगमनाची ओढ सर्वच हापूस प्रेमींना असते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी असून देखील, हापूस विक्रीवर अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे.
यंदाही अवकाळी पावसामुळे हापूस चाहत्यांचा हिरमोड होणार आहे. नोव्हेंबरची १५ तारीख उलटून गेली तरी थंडीच्या मोसमास अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्यातील इतर भागासह कोकणातही अनेक ठिकाणी पावसाची मुसळधार सुरु आहे. परिणामी कोकणचा राजा म्हणजे हापूसच्या बागायतदारांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात पडणारी थंडी ही हापूससाठी पोषक असल्याचे समजले जाते. हा काळ हापूसच्या मोहोर प्रक्रियेचा काळ असून, पावसामुळे हापूसच्या आगमनासाठी चाहत्यांना ताटकळत रहावे लागणार असल्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.