‘महाविद्यालयांना ऑफलाईन परिक्षांसाठी सक्ती नाही’ – उदय सामंत

‘महाविद्यालयांना ऑफलाईन परिक्षांसाठी सक्ती नाही’ – उदय सामंत

कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. मात्र आता कोरोन परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. मात्र जेथे शक्य असले तेथेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. परंतु महाविद्यालयांना ऑफलाईन परिक्षांसाठी सक्ती केलेली नाही, असे स्पष्ट मतही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समारंभानंतर उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या परिक्षेवर भाष्य केले. कोरोना परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घ्याव्यात असा मार्ग सुचवला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा विचार करूनच विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तसेच ऑनलाईन-ऑफलाईन परीक्षांच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांचा सभ्रम होऊ नेय याची काळजीही घ्यायला सांगितली आहे.

विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या निर्णयाबाबतही उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. कोरोनाग्रस्त परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली असली तरी आता ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर विचार करूनच विद्यार्थ्यांचे वसतीगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे उदय सामंत म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version