नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा होत असताना आजपासून त्यांच्या लग्न समारंभातील कार्यक्रमांचा सुरुवात होत असल्याचे समजते. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये दोन मुली उदयपूरच्या प्रतिष्ठित सिटी पॅलेसमध्ये फिरताना दिसत आहेत. रश्मिका आणि विजय यांच्या लग्नासाठी केलेल्या सजावटीकडे लक्ष वेधत आहेत. फुलांची सजावट, झुंबर आणि इतर सजावट या व्हिडिओत दिसत आहे.व्हिडिओमध्ये, मुली (कथितपणे राजवाड्याच्या कर्मचाऱ्यांशी चौकशी केल्यानंतर) दावा करत आहेत की, लग्न 2 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. विजय आणि रश्मिका यांनी यापूर्वी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेडमध्ये काम केले आहे. तसेच सध्या राहुल सांकृत्यन दिग्दर्शित राणाबाली या चित्रपटात काम करत आहेत. हा चित्रपट 11 सप्टेंबर 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.