विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकावला; कलम १४४ लागू

विद्यार्थ्यांनी तिरंग्याऐवजी भगवा ध्वज फडकावला; कलम १४४ लागू

कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चिघळळा असून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कर्नाटकातील हिजाब बंदीच्या वादात आता शिमोगायेथील महविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून भगवा ध्वज फडकवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विद्यार्थ्याने राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावला. तसेच बाकीचे विद्यार्थी खाली जल्लोष करताना दिसत आहे.

बागलकोटमध्ये मंगळवारी झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनाला हिसंक वळण आले. त्यामुळे बागलकोटमध्ये या घटनेनंतर कलम १४४ लागू करण्यात आला आहे. यावेळी पोलिसाकंडून लाठीचार्जही करण्यात आला.

या घटनेनंतर कर्नाटक काँग्रसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी टीका करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांची परिस्थिती वाईट झाली आहे की, याप्रकरणी राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज लावण्यात आला आहे. त्यामुळे मला वाटते, संस्थांना शिक्षा व्हायला हवी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी एक आठवडा बंद ठेवा.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version