Thalapathy Vijay Divorce Controversy: ‘माझ्या विरोधात कट रचला, अनेक वर्षे थांबून…’; भर सभेत थलपथी विजयचा आरोप; घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता

थलपथी विजय यांनी सभेत त्यांच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे
Thalapathy Vijay Divorce Controversy: ‘माझ्या विरोधात कट रचला, अनेक वर्षे थांबून…’; भर सभेत थलपथी विजयचा आरोप; घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलला अभिनेता

Thalapathy Vijay Divorce Controversy: दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने तामिळनाडूमधील एका सार्वजनिक सभेत भाषण करताना त्याच्या विरोधात कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला. विशेष म्हणजे, या सभेत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चर्चांवरही पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्यातील मतभेद आणि घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. या बातम्यांमुळे त्याच्या चाहत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर विजयने सभेत बोलताना या चर्चांना राजकीय रंग देत, विरोधकांवर टीका केली.

हेही वाचा: Dhurandhar 2: काही सेकंदांच्या रोलसाठी यामी गौतमने घेतले एक-दोन नाही, तर तब्बल इतके कोटी; आकडा वाचून बसेल धक्का

विजय म्हणाला की, निवडणुकीच्या तोंडावर त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी काहीजण मुद्दाम अफवा पसरवत आहेत. “काही लोक माझ्याविरोधात कट रचत आहेत. अनेक वर्षे थांबून त्यांनी योग्य वेळ साधत या गोष्टी पुढे आणल्या. मात्र जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि अशा अफवांचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही,” असे त्याने ठामपणे सांगितले. विजयचा ‘जना नायकन’ हा बहुचर्चित चित्रपटही सध्या अडचणीत सापडला आहे. सेन्सॉर प्रक्रियेत काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने पाहिला जात असताना, त्याच्या रिलीजला उशीर होणे हेही त्यांच्या चाहत्यांसाठी निराशाजनक ठरत आहे.

राजकारणातही विजय सक्रिय झालाअसून, त्यांच्या  तामिळगा वेत्री कझम (TVK) या पक्षाच्या माध्यमातून ते आगामी निवडणुकांची तयारी करत आहे. विविध भागांमध्ये सभा घेत त्याने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न दिसून येतो.
सभेत बोलताना विजयने स्पष्ट केलं की, “मला जनतेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण माझा लोकांशी असलेला संबंध इतका मजबूत आहे की, तो कोणीही तोडू शकत नाही.” त्याच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा: Samay Raina Controversy: अमिताभ बच्चन यांच्यावर समय रैनाची वादग्रस्त टिप्पणी; चाहत्यांचा संताप, सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू

एकीकडे वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांचा ताण, तर दुसरीकडे चित्रपट आणि राजकारणातील आव्हानं अशा तिहेरी दबावातही विजय आत्मविश्वासाने उभा असल्याचं दिसत आहे. त्याच्या या भूमिकेमुळे समर्थकांमध्ये उत्साह वाढला असून, विरोधकांवरही त्याने थेट निशाणा साधला आहे.विजयच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. पुढील काळात या घडामोडी कोणत्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version