बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये आता ‘टिकिट टू फिनाले’साठी चढाओढ पाहायला मिळत आहे. 11 जानेवारीपासून सुरु झालेला बिग बॉस सीझन 6 आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एकूण 7 सदस्य आहेत. यामध्ये तन्वी, अनुश्री, राकेश, दिपाली, रेवा, विशाल आणि राखी यांचा समावेश आहे. ज्यात राखी आणि रेवा या वाईल्ड कार्ड सदस्य आहेत. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या ग्रँड फिनालेसाठी अवघे काही दिवसच उरले आहेत. बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड फिनाले 19 एप्रिलला पार पडणार आहे. त्यापुर्वी घरातील सदस्यांमध्ये ‘टिकिट टू फिनाले’ च्या शर्यतीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अशातच बिग बॉस सीझन 6 ची पहिली ‘टिकिट टू फिनाले’ ची मानकरी तन्वी कोलते ठरली आहे. 7 एप्रिल रोजी राकेश बापट, अनुश्री माने आणि तन्वी कोलते यांच्यात ‘टिकिट टू फिनाले’साठी महाटास्क पार पडला ज्यात योग्य उत्तर देत तन्वीने बाजी मारली आणि ती थेट पहिली फायलिस्ट ठरली आहे. यावेळी कलर्स मराठी या वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, महाटास्क जिंकत तन्वीने मारली बाजी… ती ठरली Ticket to finale ची मानकरी!
हेही वाचा- Dhurandhar 2: दाऊद इब्राहिम समजून व्हायरल झालेला फोटो निघाला फेक; फोटोतील व्यक्ती कोण? धक्कादायक सत्य समोर
दुसरा फायनलिस्ट कोण?
तर दुसरीकडे आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनच्या टॉप 5 मध्ये जाणारा दुसरा फायनलिस्ट म्हणून रेवाचं नाव पुढे येत आहे. यामगचं कारण असं की, गेल्या आठवड्यात रेवा या सीझनची शेवटची कॅप्टन होती. ज्यामुळे रेवा नॉमिनेशनपासून वाचली, तर उर्वरित 7 पैकी 5 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ज्यात अनुश्री, राकेश, दिपाली, विशाल, राखी यांचा समावेश आहे. सध्या घरात सेफ अशी रेवाच आहे त्यामुळे तन्वीनंतर दुसरी फायनलिस्ट म्हणून रेवाचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- Tatiri Song Controversy: रॅपर बादशाहकडून ‘टटीरी’ गाण्याबद्दल लेखी माफी; 50 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार
विशाल संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधून विशाल कोटियन याला राकेश बापटसोबतच्या भांडणात शारीरिक धक्का-बुक्की केल्याप्रकरणी आणि वैयक्तिक टिप्पणी केल्याप्रकरणी संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट करण्यात आले आहे. या कठोर शिक्षेमुळे विशाल कॅप्टन्सी आणि ‘टिकिट टू फिनाले’ शर्यतीतूनही बाद झाला आहे. आता राकेश, रेवा, अनुश्री, राखी, विशाल, दिपाली यांच्यापैकी बिग बॉस मराठी सीझनच्या टॉप 5 मध्ये जाणारे इतर 4 सदस्य कोणते असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.