Rhea Kapoor’s Diamond Earring Stolen : रिया कपूरची चिंता वाढली!, विमान प्रवासात तब्बल 1.35 कोटींचे पाचू, हिरेजडित सोन्याचे कानातले गायब

Rhea Kapoor’s Diamond Earring Stolen : रिया कपूरची चिंता वाढली!, विमान प्रवासात तब्बल 1.35 कोटींचे पाचू, हिरेजडित सोन्याचे कानातले गायब

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार अनिल कपूर यांची मुलगी तर सोनम कपूर हिची बहिणी रिया कपूर यांचे तब्बल 1.35 कोटींचे दागिने चोली केल्याची तक्रार मुंबई पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट आणि चित्रपट निर्माती रिया कपूर यांना नुकतेच चोरीचा फटका बसला आहे. न्यूयॉर्क दौऱ्यादरम्यान दिग्दर्शक आणि स्टायलिस्ट रिया कपूर यांच्या टीमकडून नेले जाणारे 1.35 कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे कानातले गायब झाल्याप्रकरणी मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यू दौऱ्यांच्या दरम्यान आणि स्टायलिस्ट रिया कपूर टीमने त्यांच्याकडून 1.35 कोटी रुपये किमतीचे हिऱ्यांचे कानातले गायब झाल्याने मुंबईतील सहार पोलिसांकडून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Rohini Paradhye Case : रीलस्टार रोहिणी पाराध्ये मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 25 दिवसांनंतर पतीविरोधात झाला मोठा उलगडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांपासून रिया कपूरसोबत काम करणाऱ्या सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सावलीन सिंग यांच्यावर न्यूयॉर्कमधील एका फॅशन इव्हेंटसाठी मुंबईतील ज्वेलर्सकडून भाड्याने घेतलेल्या दोन महागड्या कानातल्यांच्या जोड्या नेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रिया कपूर आणि तिची टीम ‘मेट गाला’ला (Met Gala) उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेली होती. हे दागिने ‘मेहता ज्वेलर्स’ आणि ‘गोएंका ज्वेलर्स’कडून खरेदी करण्यात आले होते. ते दोन वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवले होते. प्रवासादरम्यान सिंग यांनी हे बॉक्स आपल्या हँडबॅगमध्ये बाळगले होते. 27 एप्रिल रोजी रात्री 10.25 वाजता हे पथक मुंबईहून एमिरेट्सच्या विमानाने रवाना झाले. तर दुबईमार्गे 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास न्यूयॉर्कमधील जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. न्यूयॉर्कमधील ‘पिअर हॉटेल’मध्ये पोहोचल्यानंतर, शिरीन या टीममधील दुसऱ्या सदस्याला दागिने देण्यासाठी सिंग यांनी कथितरीत्या त्या पेट्या उघडल्या. त्यावेळी त्यांना त्या दोन्ही पेट्या रिकाम्या असल्याचे आढळले.

हरवलेल्या दागिन्यांमध्ये ‘मेहता ज्वेलर्स’च्या 18-कॅरेटचे पाचू (emerald) आणि हिरे जडित सोन्याच्या कानातल्यांच्या जोडीचा समावेश होता. त्याची किंमत 66 लाख रुपये आहे. दुसरी वस्तू ‘गोएंका ज्वेलर्स’ची झांबियन पाचू आणि सोन्याची किनार असलेली कानातल्यांची जोडी होती. जिचे मूल्य 69 लाख रुपये असल्याचे अंदाजित आहे. हरवलेल्या दागिन्यांचे एकूण मूल्य 1.35  कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. मुंबईला परतल्यानंतर सावलीन सिंग यांनी सहार पोलीस ठाण्यात जाऊन दागिने चोरीला गेल्याबाबत तक्रार नोंदवली. त्यांच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी चोरीशी संबंधित ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) च्या कलम 303(2) अन्वये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version