वाढत्या महिला अत्याचाराविरुद्ध मूकमोर्चा काढुन निषेध

वाढत्या महिला अत्याचाराविरुद्ध मूकमोर्चा काढुन निषेध

अलिबाग : देशभरात महिला आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आरोपी नराधमांना कठोर शासन व्हावे यासाठी अंनिस समितीने रायगड जिल्हा मुख्यालयावर मूकमोर्चा काढत या घटनांचा निषेध केला.

तोंडाला काळ्या पट्टया आणि हातात निषेधाचे फलक घेऊन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

महिला अत्याचार प्रकरणी कायदा अधिक कठोर करावा. आरोपी नराधमांना कठोर शासन व्हावे. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवाव्यात.

महिला अत्याचाराचाच्या केस दाखल करणे आणि तपास प्रक्रीया अधिक वेगवान व्हाव्यात अशा मागण्या या वेळी मोर्चेकऱ्यांनी केल्या. याबाबतचे निवेदन रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांना देण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version