मालेगावात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

मालेगावात अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी, महालपाटणे, रणादेव पाडा, देवपूरपाडे आणि मालेगावच्या पाटणे, चिंचावड परिसरात अवकाळी पावासाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतात काढून ठेवलेला कांदा पावसामुळे भिजल्यामुळे मालेगावात शेतकरी हवालदिल झाला आहे.

ऐन थंडिच्या दिवसात, अवकाळी पावसामुळे बळीराजाची धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांचे काढणी आले, लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे कांद्याच्या रोपाला याचा जबर फटका बसणार आहे. तसेच नवीन लागवड झालेल्या उन्हाळी कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. देवळयाच्या मेशीमध्ये जोरदार पाऊस झाला. तासभर सुरू असलेल्या पावसाने शेतासह अनेक सकल भागात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version