Anaya Bangar Gender Affirming Surgery : भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर सध्या तिच्या धाडसी निर्णयामुळे जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. अनायाने नुकतीच थायलंडमध्ये ‘जेंडर अफर्मिंग सर्जरी’ (लिंगबदल शस्त्रक्रिया) यशस्वीपणे पूर्ण केली असून, तिने सोशल मीडियावर या प्रवासाबद्दल एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. जन्माने मुलगा (आर्यन) असलेल्या अनायाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, या शस्त्रक्रियेपेक्षाही तिच्या ‘आई-बाबा’ होण्याच्या शक्यतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
स्वतःचे शुक्राणू केलेत गोठवून सुरक्षित
अनायाबद्दलची सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे तिने शस्त्रक्रियेपूर्वीच एक मोठा निर्णय घेतला होता. एका प्रसिद्ध रिअॅलिटी शो (2025) दरम्यान अनायाने खुलासा केला होता की, तिने तिचे शुक्राणू (Sperms) गोठवून (Freeze) ठेवले आहेत. याचा अर्थ असा की, भविष्यात जेव्हा अनायाला अपत्य हवे असेल, तेव्हा ती या शुक्राणूंचा वापर करून सरोगसीद्वारे तिच्या मुलाची ‘जैविक आई’ बनू शकते. तिच्या शरीरात गर्भाशय नसल्यामुळे ती नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाही, मात्र तांत्रिकदृष्ट्या ती बाळाची जैविक पालक ठरेल.
देशातील पहिलेच अनोखे प्रकरण?
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, जर अनायाने गोठवलेल्या शुक्राणूंद्वारे सरोगसीचा पर्याय निवडला, तर ती त्या बाळाची आई आणि वडील दोन्ही असेल. कारण शुक्राणू तिचे स्वतःचे असतील (पित्याची भूमिका) आणि ती आता स्त्री म्हणून त्या बाळाचे संगोपन करेल (आईची भूमिका). इतिहासातील आणि विशेषतः भारतातील हे अशा प्रकारचे पहिलेच अनोखे प्रकरण ठरू शकते, जिथे एकच व्यक्ती बाळाचे दोन्ही पालक असेल. या संकल्पनेमुळे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सुनके अजीब लगेगा… लेकिन ये सच है” Sanjay Bangar के बेटे आर्यन बांगर
अब अनाया बांगर बन चुके हैं इस सफर में कई surgeries हुई
काफी मुश्किलें आईं जेंडर बदलने से पहले ही इन्होंने अपना sperm freeze करवा लिया
ताकि future में biological बच्चा possible रहे अब अनाया surrogacy के जरिए… pic.twitter.com/YKglOQeILO — शब्द (@Only1MyThoughts) March 18, 2026
Sanjay Bangar's son, Aryan Bangar, has now transitioned into a woman!? Science has stunned those who have been spreading hypocrisy in the name of "God's blessing" for years. Now, Anaya Bangar can become a mother through surrogacy, though not through physical intercourse,… pic.twitter.com/oOLDNykMs9 — Cricket Central (@CricketCentrl) March 18, 2026
कुटुंबाचा खंबीर आधार आणि सामाजिक लढा
लिंगबदल शस्त्रक्रियेचा निर्णय घेताना अनायाला अनेक सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला. समाजाकडून मिळणारा द्वेष आणि टीका बाजूला सारून तिने आपल्या मनाचे ऐकले. या संपूर्ण प्रवासात वडील संजय बांगर आणि कुटुंबाने तिला खंबीर पाठिंबा दिला, ज्याचा उल्लेख तिने आपल्या पोस्टमध्ये आवर्जून केला आहे. सध्या अनायाची प्रकृती सुधारत असून, ती एका नव्या जादुई प्रवासासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या निर्णयामुळे ट्रान्सजेंडर समुदायातील अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
हेही वाचा – Actress Car Accident: कार दुभाजकाला धडकून उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं; 30 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.