सोलापूर शहरात एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार केलाच धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिद्धाराम उर्फ सिद्धया सलगर या संशयित आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने बालकाला आपल्या घरी घेऊन गेला आणि अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलाने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. हा आवाज ऐकून परिसरातील एका महिलेने तत्काळ सतर्कता दाखवत इतर नागरिकांना माहिती दिली. तिच्या सतर्कतेमुळे परिसरात जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आली.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपीला पकडण्यास मदत केली. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.पोलिसांनी या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीविरोधात बालक संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत तसेच इतर गंभीर कलमांनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे सोलापूर शहरात बालसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून पोलिस प्रशासनानेही अशा गुन्ह्यांवर कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.