आरटीओविरोधात रिक्षाचालक आक्रमक; ठाण्याच्या उपनगरात रिक्षा संप

आरटीओविरोधात रिक्षाचालक आक्रमक; ठाण्याच्या उपनगरात रिक्षा संप

अंबरनाथ, बदलापूरमधील तब्बल १३ हजार रिक्षा चालक दोन दिवसात बेमुदत बंद करणार आहेत. कल्याण आरटीओच्या नव्या दर पत्रकांविरोधात दोन्ही शहरातील रिक्षा चालक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील रिक्षा भाडे घोषित करण्यात आले असून रिक्षाचे किमान भाडे ९ रुपये ठरवून देण्यात आले असल्याची माहिती कल्याण आरटीओचे अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे प्रवासी रिक्षा भाडेवाढ करणाऱ्या रिक्षाचालकांना परिवहन विभागाने दणका दिला आहे. अंबरनाथ, बदलापूरमधील तब्बल १३ हजार रिक्षा चालक दोन दिवसात बेमुदत बंद करणार आहेत. त्यामुळे आरटिओविरोधात रिक्षाचालक आक्रमक झाले असून रिक्षाचालक दोन दिवसाचा संप पुकारणार आहेत.

कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावल्यामुळे राज्य सरकराने रिक्षाने प्रवास करण्यास परवानगी दिली. त्यानंतर रिक्षाचालकांनी रिक्षाची भाडेवाढ वाढवली. तसेच आता रिक्षात तीन ते चार प्रवासी बसले असतानाही अतिरिक्त भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. याच पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचे किमान भाडे ९ रुपये ठरवले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version