Delhi CISF Jawan News: मेट्रोच्या गर्दीत CISF जवानाचा कारनामा! महिलेचे चोरून फोटो काढले, पकडल्यानंतर मोबाईलची गॅलरी उघडताच समोर आलं धक्कादायक सत्य

दिल्लीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत आधीच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मेट्रोतील गर्दीचा फायदा घेत CISF जवानाचा कारनामा उघड झाला आहे.
Delhi CISF Jawan News: मेट्रोच्या गर्दीत CISF जवानाचा कारनामा!  महिलेचे चोरून फोटो काढले, पकडल्यानंतर मोबाईलची गॅलरी उघडताच समोर आलं धक्कादायक सत्य

दिल्लीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिल्लीत आधीच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना मेट्रोतील गर्दीचा फायदा घेत CISF जवानाचा कारनामा उघड झाला आहे. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी रात्री दिल्ली मेट्रोच्या यलो लाईनवर AIIMS मेट्रो स्टेशनजवळ एका CISF जवानाने महिलेचे फोटो काढले होते. महिलेला हे समजताच तिने आणि इतर प्रवाशांनी जवानाला मोबाईलची फोटो गॅलरी दाखवण्यास सांगितले. मात्र जवान मोबाईल दाखवण्यास नकार देत होता.

त्यानंतर संशय आल्यानंतर मेट्रोमधील प्रवाशांनी CISF जवानाला घेरले आणि जबरदस्ती जवानाचा मोबाईल तपासला. त्यानंतर मोबाईलच्या गॅलरीमध्ये महिलेचे फोटो स्पष्टपणे दिसून आले. यानंतर कोचमध्ये मोठा गोंधळ झाला आणि प्रवाशांनी जवानाला फोटो डिलीट करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान मोबाईलमध्ये फोटो दिसताच महिला आक्रमक झाली आणि तिने 'हे काय आहे? माझा फोटो डिलीट करा' असं म्हणत CISF जवानाला फोटो डिलीट करण्यास सांगितले.

हेही वाचा- Mumbai Navy Sailor Family Update : मुंबईत नौदल जवानासह संपूर्ण कुटुंब मृतावस्थेत! पोलिसांच्या हाती लागला 'तो' सुगावा; मृत्यूपूर्वी वडिलांना काय पाठवलं?

याचदरम्यान काही प्रवाशांनी जवानाचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. प्रकरण वाढल्यानंतर मेट्रोच्या कोचमध्ये प्रवासी आणि CISF जवानामध्ये धक्काबुक्कीची परिस्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच CISFने संबंधित जवानाला तत्काळ निलंबित केले असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे दिल्ली मेट्रोमध्ये महिला प्रवाशांच्या गोपनीयता आणि सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

CISFने काय म्हटले? 
मेट्रो ट्रेनमध्ये एका महिला प्रवाशासोबत सीआयएसएफच्या एका जवानाने केलेल्या कथित गैरवर्तनाबाबत एक प्रकरण समोर आले आहे. सीआयएसएफने सर्वोच्च स्तरावर या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. संबंधित जवानाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले असून, सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निष्कर्षांनुसार पुढील योग्य कारवाई केली जाईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version