Papmochani Ekadashi 2026: उद्या पापमोचनी एकादशी! या शुभ मुहूर्तावर करा विष्णू पूजन; जाणून घ्या व्रत विधी आणि पारणाची वेळ

Papmochani Ekadashi 2026: उद्या पापमोचनी एकादशी! या शुभ मुहूर्तावर करा विष्णू पूजन; जाणून घ्या व्रत विधी आणि पारणाची वेळ

papmochani ekadashi 2026: हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान विष्णूंना समर्पित असलेली ही तिथी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला ‘पापमोचनी एकादशी’ असे म्हटले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, या दिवशी उपवास आणि विधीपूर्वक पूजा केल्याने व्यक्तीच्या नकळत किंवा जाणूनबुजून झालेल्या पापांचे क्षालन होते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते.

पंचांगानुसार, यंदा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सुरू झाली आहे. ही तिथी पुढील दिवशी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहणार आहे. उदया तिथी लक्षात घेता पापमोचनी एकादशीचा उपवास पुढील दिवशी म्हणजेच १५ मार्च रोजी पाळला जाणार आहे. त्यामुळे विष्णू भक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा: Why Copper Kalash On Gudi: गुढीपाडव्याला गुढीवर तांब्याचाच कलश का ठेवतात? पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेमागचं कारण जाणून घ्या

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर भगवान विष्णूंचे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. घरातील देवघरात किंवा मंदिरात भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावून पूजा करावी. पूजेदरम्यान भगवानाला जल, अक्षत, चंदन, पिवळी फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करावा.

पापमोचनी एकादशीच्या दिवशी विष्णू मंत्रांचा जप करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक समाधान मिळते, असे मानले जाते. याशिवाय या दिवशी पापमोचनी एकादशीची कथा ऐकणे किंवा वाचन करणेही धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. पूजेच्या शेवटी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करून भक्तांनी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.

हेही वाचा:Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्री कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या घटस्थापनेचा अचूक मुहूर्त, नवदुर्गा पूजा आणि संपूर्ण पूजाविधी

पापमोचनी एकादशीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला पारण केले जाते. यंदा पारण १६ मार्च रोजी केले जाणार आहे. द्वादशी तिथी सकाळी ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत राहणार असल्याने सकाळी ६ वाजून ३० मिनिटांपासून ८ वाजून ५४ मिनिटांपर्यंत पारण करणे शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यतेनुसार, पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनःशांती मिळते आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते. अनेक भक्त या दिवशी दानधर्म, जप आणि ध्यान यांसारख्या आध्यात्मिक कृतींनाही प्राधान्य देतात. त्यामुळे भक्तांसाठी पापमोचनी एकादशी हा दिवस श्रद्धा आणि भक्तीचा मानला जातो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version