Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू

अहिल्यानगरमध्ये दोन गटात जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे
Ahilyanagar Crime : अहिल्यानगरमध्ये दोन गटात गँगवॉर; जुन्या वादातून तुफान राडा, तर गोळीबारात एकाचा मृत्यू

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये दोन गटात जुन्या वादातून गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव परिसरात ही घटना घडली. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही गटांकडून हॉस्पिटल परिसरातही परस्पर मारहाण झाल्याची घटना घडली, अशी माहिती समोर आली आहे. घटनेनंतर साईदीप हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोळीबार नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना गँगवारमधून घडली असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितलं आहे.

हेही वाचा : Viral Incident: जबरदस्तीचं लग्न, पलंगावर सापाची कात; तरुणीने नागिणीचं रूप धारण केलं? नेमकं घडलं तरी काय…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version