Nashik Crime: क्रौर्याच्या सर्व सीमा पार! नाशिकमध्ये प्रेमविवाहानंतर विवाहितेचा तब्बल 8 वेळा गर्भपात; शहरात संतापाची लाट

नाशिकमध्ये प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने पती आणि सासरच्या मंडळींवर मानसिक छळ, धमक्या आणि आठ वेळा गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Nashik Crime: क्रौर्याच्या सर्व सीमा पार! नाशिकमध्ये प्रेमविवाहानंतर विवाहितेचा तब्बल 8 वेळा गर्भपात; शहरात संतापाची लाट

नाशिकमध्ये एका विवाहित महिलेला वारंवार गर्भपातासाठी भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि आर्थिक छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तू आमच्या जातीची नाहीस” असे म्हणत सतत अपमान केला जात होता, अशी तक्रार महिलेने पोलिसांकडे दिली आहे.

तसेच महिलेला वेड ठरवून मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची धमकी दिली जात होती, असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या त्रासामुळे संबंधित महिलेला मानसिक तणावाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणात पती विजय दशरथ महाजन, सासू निर्मला दशरथ महाजन आणि सासरे दशरथ तुकाराम महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनुसार, पतीने नाशिकमध्ये घर घेण्यासाठी तिच्याकडील पैसे तसेच सोने-चांदीचे दागिने वापरल्याचाही आरोप आहे.सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विवाहितेचा तब्बल आठ वेळा गर्भपात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हसरूळ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वैद्यकीय कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक छळासंदर्भातील पुरावे तपासले जात आहेत.दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि कौटुंबिक अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून संबंधित आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version