Nagpur News : मंदिरात आसरा घेतला… अन् काळाने घाला घातला; दोन भावांचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वीज कोसळून २ आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याचा कळमेश्वर परिसरात ही घटना घडली असून टिबुराज राजेंद्र कानफाडे वय
Nagpur News : मंदिरात आसरा घेतला… अन् काळाने घाला घातला; दोन भावांचा जागीच मृत्यू

नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वीज कोसळून 2 आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्याचा कळमेश्वर परिसरात ही घटना घडली असून टिबुराज राजेंद्र कानफाडे वय 65 आणि लक्ष्मण घनश्याम कानफाडे वय 53 अशी मृत भावांची नावे आहे. मंदिरात कळमेश्वर तालुक्यातील तिष्टी गावालगतच्या शेतातील माता-माय मंदिरावर वीज कोसळली. 

हे दोन्ही भाऊ शेतात जनावरे चारत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली व विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे पावसापासून बचावण्यासाठी दोघांनी शेतातील मंदिरात आसरा घेतला. अचानक जोरदार पावसामुळे मंदिर परिसरात वीज कोसळली, त्यात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी दोन्ही भाऊ घरी परतले नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध सुरू केला. शोध घेत असताना दोन्ही भाऊ मंदिरात मृतावस्थेत आढळून आले. एकाच कुटुंबातील दोन भावांचा मृत्यू झाल्याने कानफाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

हेही वाचा -Crime : विवाहित महिलेचा तरुणीवर जडला जीव! 3 लेकरांना सोडून पळाली अन्… पोलिसांनी खोलीत पाहिलं ते धक्कादायक

हे दोन्ही भाऊ मेहनती आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. मोहपा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version