Nagpur Crime: आधी अपहरण, हात-पाय बांधून बेदम मारहाण अन् नंतर वारंवार…; नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत क्रूर कृत्य

नागपुरातील अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील आरोपी निर्मय पाखरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
Nagpur Crime: आधी अपहरण, हात-पाय बांधून बेदम मारहाण अन् नंतर वारंवार…; नागपुरात अल्पवयीन मुलीसोबत क्रूर कृत्य

नागपुरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या निर्मय उर्फ आकाश पाखरे या नराधमाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नागपुरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी निर्मय पाखरे याने अल्पवयीन पीडित मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिचे हातपाय दोरीने बांधून ठेवले आणि कंबरेच्या पट्ट्याने तिला अत्यंत निर्घृणपणे बेदम मारहाण केली. या भयानक प्रकारानंतर आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली होती.

सुरवातीला न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना अजिबात सहकार्य केले नाही. तपास अधिकाऱ्यांनी विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आरोपीने पूर्णपणे मौन बाळगणे पसंत केले. आरोपीकडून थेट माहिती मिळत नसल्याने, आता तपास यंत्रणेने वैज्ञानिक आणि डिजिटल पुराव्यांवर आपला भर केंद्रित केला आहे. या गुन्ह्यात डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपीचे दोन्ही मोबाईल फोन जप्त केले होते. परंतु, हे दोन्ही फोन पासवर्डने लॉक असल्याने पोलिसांना त्यातील माहिती आणि डेटा मिळवण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही मोबाईल फोन तांत्रिक विश्लेषण आणि डेटा रिकव्हरीसाठी सायबर पोलिसांकडे पाठवण्यात आले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version