Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये 79 लाखांचा गंडा; बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश, कागदपत्रे पाठवून फसवणूक

Digital Arrest : डिजिटल अरेस्टच्या दोन घटनांमध्ये 79 लाखांचा गंडा; बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश, कागदपत्रे पाठवून फसवणूक

मुंबई : दोन वेगवेगळ्या डिजिटल अरेस्ट घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची जवळपास 79 लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. पीडितांपैकी एक निवृत्त आयकर अधिकारी आहेत. उत्तर विभागीय सायबर पोलिसांनी फसवणुकीतून मिळालेली रक्कम त्यांच्याशी संबंधित बँक खात्यांमध्ये शोधून काढल्यानंतर केरळमधून कथित लाभार्थ्यांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, ते पैशांच्या व्यवहाराचा माग काढत असून या नेटवर्कमधील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत. पहिल्या प्रकरणात दहिसर येथील एका 75 वर्षीय निवृत्त आयकर अधिकाऱ्याची 51 लाख रुपयांची फसवणूक झाली. सायबर टीमने पैशांच्या संशयास्पद व्यवहारांचा माग केरळपर्यंत काढला तर 14 ऑगस्ट रोजी मुहम्मद सफवान अब्दुल हमीद याला अटक केली. केरळमध्ये न्यायाधीशांसमोर हजर केल्यानंतर, हमीदला ट्रान्झिट रिमांड मंजूर करून मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

हेही वाचा : Junnar crime: ‘बघा, मी CCTV मध्ये दिसतोय…’ आरोपीच्या एका वाक्याने पोलिसांना मिळाला मोठा क्लू; जुन्नर प्रकरणाचा थरारक उलगडा

तर दुसऱ्या घटनेत बोरिवली येथील एका 76 वर्षीय निवृत्त महिलेने 7 जुलै ते 21 जुलैदरम्यान कथितरित्या 28.70 लाख रुपये गमावले. पोलिसांच्या माहितीनुसार तिला नाशिकचे पोलीस उपनिरीक्षक संदीप राव असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्याने तिला कथितरित्या सांगितले की, तिच्या एटीएम कार्डमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. फसवणूक करणाऱ्यांनी तिला बनावट अटक वॉरंट, जप्तीचे आदेश आणि इतर कागदपत्रे पाठवली. त्यानंतर अटक टाळण्यासाठी आणि जामीन मिळवण्यासाठी पैसे देण्यास तिला सांगण्यात आले. अखेरीस पीडितेने 28.70 लाख रुपये हस्तांतरित केले, असे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान, पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेपैकी 8.50 लाख रुपये केरळमधील एर्नाकुलम येथील एम. बी. ट्रेडर्सशी संबंधित एका खात्यात असल्याचे शोधून काढले. त्यानंतर, पोलिसांनी फर्मचे मालक शेजिमोन एम. के. यांना अटक केली. त्यांना 14 ऑगस्ट रोजी अटक करून मुंबईत आणण्यात आले.

उत्तर सायबर पोलीस आता फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरल्या गेलेल्या बँक खात्यांची तपासणी करत असून, त्यानंतर पैशांच्या झालेल्या हालचालींचा मागोवा घेत आहेत. तपास अधिकारी इतर खातेधारक, लाभार्थी आणि कथित सायबर-फसवणूक नेटवर्कच्या सदस्यांना ओळखण्याचाही प्रयत्न करत आहेत. हा तपास पीआय सुनील लोखंडे, एपीआय राहुल खेत्रे, पीएसआय रोहन अहिरे, एचसी परब, एचसी गवळी, पीसी शिंदे आणि पीसी चव्हाण यांच्यामार्फत केला जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version