Latur Crime News : लातूर हादरलं! शिक्षण संस्थाचालकाने डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवलं; दोन ओळींच्या चिठ्ठीतून पोलिसांना केली ‘ही’ विनंती

Latur Crime News : लातूर हादरलं! शिक्षण संस्थाचालकाने डोक्यात गोळ्या झाडून आयुष्य संपवलं; दोन ओळींच्या चिठ्ठीतून पोलिसांना केली ‘ही’ विनंती

लातूर : लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. लातूरच्या शिक्षण संस्थाचालकाने स्वतःच्याच डोक्यात गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने लातूरमध्ये खळबळ माजली आहे. संजीव चंद्रभानू सोनवणे (वय ६२) असे या शिक्षण संस्थाचालकाचे नाव आहे. सोनवणे यांनी शहरातील पद्मानगर भागातील राहत्या घरीच त्यांचे जीवन संपवलं. शैक्षणिक क्षेत्रात लातूर पॅटर्नची अनेकदा चर्चा होते. लातूरमध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेपर फुटीमुळे लातूर चर्चेत असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : Pimpri Chinchwad Crime: पहाटे दोघांची भेट झाली, नेमकी तीच गोष्ट घडली अन् तिसऱ्याने साधला डाव; पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

संजीव चंद्रभानू सोनवणे यांनी मृत्यूच्या आधी एक चिठ्ठीदेखील लिहिल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या आत्महत्येस कुणालाही जबाबदार धरू नये, असं संजीव सोनवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसांना देखील आवाहन केलं आहे की, माझ्या आत्महत्येचा तपासही करू नये, असंही संजीव सोनवणे यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहिलं होतं. या घटनेनंतर पद्मानगर भागात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. संजीव सोनवणे हे घरी एकटेच राहत होते. सोनवणे यांचं कुटुंबीय हे विदेशात राहत होते, विविध आजारांनी ग्रस्त असल्यामुळे आत्महत्या केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version