Crime : विवाहित महिलेचा तरुणीवर जडला जीव! 3 लेकरांना सोडून पळाली अन्… पोलिसांनी खोलीत पाहिलं ते धक्कादायक

कुटुंबासोबत सुखाने संसार सुरु असतानाच अचानक एक महिला घरातून गायब झाली आणि तिच्या बेपत्ता होण्याने अख्खं कुटुंब चिंतेत पडलं.
Crime : विवाहित महिलेचा तरुणीवर जडला जीव! 3 लेकरांना सोडून पळाली अन्… पोलिसांनी खोलीत पाहिलं ते धक्कादायक

कुटुंबासोबत सुखाने संसार सुरु असतानाच अचानक एक महिला घरातून गायब झाली आणि तिच्या बेपत्ता होण्याने अख्खं कुटुंब चिंतेत पडलं. पती आणि तीन चिमुकल्या मुलांना सोडून गेलेल्या या महिलेचा शोध घेत असताना पोलिसांसमोर जे सत्य आलं, त्याने घरातील प्रत्येक सदस्यासह परिसरातील लोकांनाही मोठा धक्का बसला.

नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधून चक्क समलैंगिक प्रेमसंबंधाची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. तीन मुंलाची आई असलेल्या 32 वर्षीय महिलेचे दिल्लीतील 30 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. या दोघींची सुमारे वर्षभरापूर्वीच इंस्टाग्रावर ओळख झाली होती. सुरुवातीला फक्त सोशल मीडियावर सुरु झालेली ही मैत्री होती. मात्र, हळूहळू ती प्रेमात बदलली. त्यानंतर दोघींनी ही एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा-Ketan Agarwal Case: बनावट खातं, लोहगडाच्या 3 फेऱ्या अन् ऑपरेशन हनीमून…. सिया गोयल आणि चेतनच्या कटाचा पर्दाफाश

दरम्यान, 6 सप्टेंबर रोजी ही महिला अचानक घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेली. पुन्हा ती घरी परत न आल्याने महिलेच्या घरच्यांनी महाराजपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची गांभीर्यता ओळखत तातडीने तपास सुरु केला. या तपासा दरम्यान ही महिला एका भाड्यात खोलीत राहत असल्याची माहिती मिळाली.

समोर आली धक्कादायक माहिती
त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी गेले असता, महिला ही तिच्या दिल्लीतील प्रेयसीसोबत राहत असल्याचे दिसून आले. सरसौल येथील एका तरुणाच्या मदतीने दोघींनी ही खोली भाड्याने घेतल्याचे तपासात समोर आले.  पोलिसांनी या दोन्ही महिलांसह त्यांना मदत करणाऱ्याला एका तरुणाला महाराजपूर पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान या दोन्ही महिलांनी लग्न करुन एकत्र आयुष्य घालवण्याची इच्छाही व्यक्त केली. विशेष म्हणजे, संबंधित महिला आपल्या पतीकडे किंवा घरी परत जाण्यास तयार नव्हती. ती तिच्या प्रेयसीसोबतच राहण्याच्या निर्मयावर ठाम आहे.सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version