Food Poisoning Case : तुम्हालाही पाणीपुरी खूपच आवडते का? तर ही बातमी चक्की वाचा; पाणीपुरी खाल्ल्याने एका चिमुकल्याने गमावला जीव, तर 18 जण गंभीर

प्रशासनाने तपास सुरू केला असून अन्न सुरक्षा विभागाकडून नमुन्यांची पडताळणी सुरू आहे.
Food Poisoning Case : तुम्हालाही पाणीपुरी खूपच आवडते का? तर ही बातमी चक्की वाचा; पाणीपुरी खाल्ल्याने एका चिमुकल्याने गमावला जीव, तर 18 जण गंभीर

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात दूषित अन्नामुळे घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याचे हे गंभीर उदाहरण ठरले आहे. पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर अन्नविषबाधा होऊन एका सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून अनेक मुले अद्याप उपचार घेत आहेत.

ही घटना मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजटों गावात घडली. शनिवारी (25 एप्रिल 2026) सायंकाळी एका फेरीवाल्याने गावात पाणीपुरी आणि छोले विक्रीसाठी आणले होते. गावातील मुले आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात हे पदार्थ खाल्ले. मात्र काही तासांतच अनेकांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला आणि परिस्थिती झपाट्याने गंभीर बनली.

रविवारी (26 एप्रिल 2026) संध्याकाळपर्यंत आजारी पडलेल्या लोकांची संख्या वाढत गेली. उपचार सुरू असताना सहा वर्षीय रंजन कुमार याची प्रकृती अचानक खालावली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या 18 मुलांना गिरिडीह सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: Maharashtra HeatWave : राज्यात उन्हाची काहिली वाढली! या जिल्ह्यातील तापमानाचा रेकॉर्डब्रेक आकडा; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नागरिकांच्या मते, फेरीवाल्याकडून घेतलेल्या पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतरच सर्वांची तब्येत बिघडली. त्यामुळे हे खाद्यपदार्थ दूषित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंता पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रामनिवास यादव, सदर उपविभागीय अधिकारी श्रीकांत यशवंत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जितवाहन उरांव यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी डॉक्टरांना सर्व रुग्णांना तातडीने आणि योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, आरोग्य विभागाची एक टीम सध्या बजटों गावात तळ ठोकून आहे. जे लोक अजून रुग्णालयात पोहोचले नाहीत, त्यांची ओळख पटवून त्यांना वैद्यकीय मदत देण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित फेरीवाल्याचा शोध सुरू केला असून, अन्न सुरक्षा विभागाला नमुने गोळा करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

हेही वाचा: Iran Pakistan Talk: 'आमचे शेजारी आहात, पण मध्यस्थ म्हणून तुमच्यावर विश्वास नाही'; इराणचा पाकिस्तानला मोठा झटका, भर सभेत काढले वाभाडे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version