Crime News : साधी चक्कर येऊन महिलेचा मृत्यू? मात्र शवविच्छेदन अहवालातून आलं धक्कादायक सत्य समोर; दीरानेच वहिनीच्या डोक्यात वार करून केलं ठार

Crime News : साधी चक्कर येऊन महिलेचा मृत्यू? मात्र शवविच्छेदन अहवालातून आलं धक्कादायक सत्य समोर; दीरानेच वहिनीच्या डोक्यात वार करून केलं ठार

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात चक्कर येऊन पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती सुरुवातीला समोर आली. नातेवाइकांनी तिच्यावरील अंत्यसंस्कारही उरकले. मात्र शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक सत्य समोर आलं आहे. महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे यातून निष्पन्न झाले आहे. लता गंगाधर साळवे या 51 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली असून, या प्रकरणात तिचा 50 वर्षीय दीर सुभाष साळवे याला आरोपी करण्यात आले आहे. भावाच्या कुटुंबाची झालेली प्रगती, नवीन घर आणि गाड्या तसेच नातेवाईकांमुळे आपली पत्नी सोडून गेल्याच्या संशयातून त्याने वहिनीची हत्या केल्याचा पोलिसांचा तपास आहे. 16 सप्टेंबर रोजी लता घरासमोर बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना घाटी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मात्र मुलाला सुरुवातीपासूनच घातपाताचा संशय होता. अखेर शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील पुराव्यांनंतर हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी 19 सप्टेंबर रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Lalbaugcha Raja 2026 : बाप्पाच्या दर्शनाची इच्छा अपुर्णच राहिली; लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version