Mumbai Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी

Mumbai Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघे गंभीर जखमी

मुंबई : नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास परिसरात तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. वाहनावरील ताबा सुटल्याने एका फॉर्च्युनर कारने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्याचवेळी मागून येणाऱ्या टेम्पोनेही ट्रकला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात फॉर्च्युनर कारमधील दोन जण आणि टेम्पो चालक असे एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघाताचा पुढील तपास कोनगाव पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : BJP National Committee List : भाजप राष्ट्रीय कार्यकारणीची यादी समोर; तावडेंवर राष्ट्रीय महामंत्रीपदाची, तर भारती पवारांवर उपाध्यक्षपदाची जबाबदारी

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version