गुजरात : पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून, गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यातील विविध जिल्ह्यांतून तसेच मध्य प्रदेशातून आठ जणांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. हे आरोपी गुजरातमध्ये दहशतवादाचे एक सक्रिय जाळे उभारण्याचे काम करत होते, असे त्यांनी सांगितले. “गुरुवारी गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून आठ आरोपींना अटक करण्यात आली. ते ‘जैश-ए-मोहम्मद’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून, गुजरातमध्ये दहशतवादी नेटवर्क उभारण्यासाठी त्या संघटनेच्या वतीने सक्रियपणे काम करत होते,” अशी माहिती एटीएसच्या (ATS) एका अधिकाऱ्याने दिली. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा (UAPA), १९६७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) यांच्या संबंधित कलमांखाली आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
Eight accused associated with the proscribed terror organisation Jaish-e-Mohammed (JeM) arrested from various districts of Gujarat and Madhya Pradesh. They were actively working on behalf of Jaish-e-Mohammed to set up an active network in the state of Gujarat to further its… pic.twitter.com/69J5WRWVKN — ANI (@ANI) July 3, 2026
गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी एक सक्रिय जाळे उभारण्याच्या उद्देशाने हे आरोपी ‘जैश-ए-मोहम्मद’साठी कार्यरत होते. या सर्व आठ आरोपींविरुद्ध UAPA (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा) च्या कलम 13, 17, 18, 38, 39 आणि BNS (भारतीय न्याय संहिता) च्या कलम 148 व 61 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुजरात एटीएसने (ATS) दिली.
आरोपींची ओळख खालीलप्रमाणे आहे –
अहमद (वडील : अब्दुल्ला गाझीवाला)
इब्राहिम (वडील : मोहम्मद हुसेन घाघा)
मुदस्सिर (वडील : अब्दुल्ला गाझीवाला)
झकारिया दुरानी (वडील : मोहम्मद अम्मार घाघा)
मुफ्ती फौजान (वडील : इस्माईल दौवा)
मोहम्मद अमीन शेरा
मोहम्मद अब्दुल (वडील : रहमान सावडी)
बिलाल मोहम्मद (वडील : अम्मार घाघा)
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.