Raigad Crime: विकृतीचा कळस! रायगडमध्ये जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 2024 पासून…

रायगडच्या माणगावमध्ये सख्ख्या बापाने 11 आणि 14 वर्षीय मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला
Raigad Crime: विकृतीचा कळस! रायगडमध्ये जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचार; 2024 पासून…

रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्ख्या बापाने आपल्या 11 आणि 14 वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलींच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को (POCSO) कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील (BNS) संबंधित कलमान्वये कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बाळाराम जाधव याने ऑक्टोबर 2024 ते जून 2026 या कालावधीत विविध ठिकाणी मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, पाबरा (ता. म्हसळा), तळा, माणगाव तसेच सातारा येथे वेळोवेळी या घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: Crime News: रिक्षाचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये; सोशल मीडियावरील पिस्तूलच्या 'त्या' फोटोने उलगडलं गूढ

या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या मुलींवरच अत्याचार केल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. आईने धाडसाने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या गंभीर प्रकरणाची नोंद घेण्यात आली.

माणगाव पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात पोस्को कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये पोस्को कायद्यानुसार कठोर शिक्षेची तरतूद असून अशा गुन्ह्यांचा तपास संवेदनशील पद्धतीने करण्याचे निर्देश आहेत.

हेही वाचा: Baramati Crime : आईच्या गळ्यावर व्रण तर मुलाच्या गळ्याला दोर; मायलेकाच्या गूढ मृत्यूने बारामती हादरली

सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पीडित मुलींचे जबाब, वैद्यकीय तपासणी तसेच इतर आवश्यक पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अत्याचार नेमक्या कोणत्या परिस्थितीत आणि किती वेळा झाले, याचा तपशीलही तपासातून समोर येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version