BMW Accident : BMW ची एका मराठी जोडप्याला धडक, पोलिसांत तक्रारही दाखल; कोस्टल रोड पुलावरून खाली कोसळलेली ‘ती’ कार पुन्हा चर्चेत

BMW Accident : BMW ची एका मराठी जोडप्याला धडक, पोलिसांत तक्रारही दाखल; कोस्टल रोड पुलावरून खाली कोसळलेली ‘ती’ कार पुन्हा चर्चेत

मुंबई : मुंबईतील एका पुलावरून खाली कोसळलेल्या आणि त्यातील तिघांचा बळी घेणाऱ्या त्या बीएमडब्ल्यू (BMW) कारने सहा महिन्यांपूर्वी एका वेगळ्या घटनेत एका जोडप्याला धडक दिली होती. मार्च महिन्यातील त्या घटनेदरम्यानचा एक व्हिडिओ आता समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 29 मार्च रोजी घडलेल्या त्या घटनेनंतर ओंकार शिर्के यांनी तक्रार दाखल केली होती. शिर्के आपल्या पत्नीसोबत प्रवास करत असताना याच बीएमडब्ल्यू कारने धडक दिली होती. शिर्के यांनी त्यावेळी या घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला होता. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मार्चमधील त्या घटनेदरम्यान शिर्के आणि बीएमडब्ल्यू (BMW) चालवणारी एक व्यक्ती दिसत आहेत.

हेही वाचा : Dahisar Ganesh Mandal : मध्यरात्री गणपती मंडपातील बाप्पाच्या मूर्तीवर दगडफेक; सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींची ओळख पटली, एकाला अटक

यापूर्वीची तक्रार रविवारी झालेल्या अपघाताआधी दाखल करण्यात आली होती. या अपघातात मुंबईच्या कोस्टल रोडवरून बीएमडब्ल्यू (BMW) ही आलिशान कार खाली कोसळल्याने त्यातील तिघे जण ठार झाले होते. तर एक जण गंभीर जखमी झाला होता. हा अपघात रविवारी पहाटे 5 च्या सुमारास घडला. कोस्टल रोड कंट्रोल रूमने दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (BMW) कार मरीन ड्राईव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. अतिवेगामुळे ही कार उड्डाणपुलावरून (एलेव्हेटेड रोडवरून) खाली कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही कार कोस्टल रोडच्या उड्डाणपुलावरून हवेत उडून खाली असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आदळताना दिसून आली. या अपघातात कारमधील तिघे जण मरण पावले, तर चौथा प्रवासी गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर सध्या रुग्णालयाच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version