Crime News: 50 जणांवर अत्याचार, एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे काळे कृत्य; आरोपीच्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले

भोपाळमधील खून प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
Crime News: 50 जणांवर अत्याचार, एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे काळे कृत्य; आरोपीच्या कबुलीजबाबाने पोलिसही हादरले

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका खून प्रकरणाच्या तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एका 28 वर्षीय व्यक्तीला फॅक्टरी कामगाराच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असून, चौकशीत त्याने केलेल्या दाव्यांमुळे पोलीसही हादरले आहेत. संबंधित व्यक्तीने गेल्या काही वर्षांत अनेक पुरुषांशी संपर्क साधल्याचे आणि त्यापैकी अनेकांवर जबरदस्ती केल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे.

भोपाळमधील कटारा हिल्स परिसरात 24 मे रोजी एका फॅक्टरी कामगाराचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हत्या म्हणून सुरू केला. मात्र तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक बाबी उघड होत गेल्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी रात्री उशिरा शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करत असे. ओळख वाढवून त्यांना चांगल्या हॉटेलमध्ये नेण्याचे आमिष दाखवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

हेही वाचा: Nasrapur Case: साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला अखेर न्याय; निकाल ऐकताच पीडितेच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा फुटला बांध

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत फॅक्टरी कामगार आणि आरोपी यांच्यात काही काळ संपर्क होता. चौकशीत आरोपीने पीडित व्यक्तीसोबत वाद झाल्याची कबुली दिली. पीडिताने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात त्याच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात संबंधित कामगाराचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपीने पीडिताचा मोबाईल फोनही सोबत घेतला होता. पोलिसांनी या मोबाईलचा माग काढत तपासाची साखळी जोडली आणि अखेर संशयितापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

दरम्यान, अटकेनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत आरोपी एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. पोलिस आता त्याच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. तसेच संभाव्य पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: Nasrapur Case: 'दया दाखवण्यासारखे एकही कारण नाही, आता फासावर…' कोर्टाचा निकाल ऐकल्यानंतर काय होती आरोपीची प्रतिक्रिया?

अधिकारी राजनिश कश्यप यांनी सांगितले की, या प्रकरणातील अनेक व्यक्तींनी सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे किंवा लाजेमुळे पोलिसांकडे तक्रार नोंदवली नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपास अधिक व्यापक पद्धतीने केला जात आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासानुसार आणखी कलमे जोडली जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीच्या पार्श्वभूमीचा, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा आणि संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास सुरू आहे .

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version