भिवंडीत अग्नितांडव, कारखान्याला आग

भिवंडीत अग्नितांडव, कारखान्याला आग

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत काराखान्यातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

शहरातील खोका कंपाऊंडमध्ये असलेल्या यंत्रमाग कारखान्याला ही आग लागली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

पण मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. कारखान्यातील कापडाचे आणि यंत्रमाग यंत्राचे नुकसान झाले आहे. जयेंद्र शहा असे या कारखान्याच्या मालकाचे नाव आहे.

तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला यश आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version